संत शिरोमणी संत जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

बुटीबोरी, दि. 8 डिसेंबर 2023: संतशिरोमणी संत जगनाडे महाराज जयंती निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बुटीबोरी येथे शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला परिसरातील व गावातील समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापूजेने झाली. त्यानंतर संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी संत जगनाडे महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, संत जगनाडे महाराज हे एक महान संत होते. त्यांनी समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य वेचले. संत तुकाराम महाराज यांचे अभंग पुन्हा समाजापुढे आणली. त्यांनी मानवतेची शिकवण दिली. संत जगनाडे महाराजांचे विचार आपल्याला जीवनात मार्गदर्शन करतात. आपण त्यांच्या विचारांचे अनुसरण करून आपले जीवन सुखी व समृद्ध बनवू शकतो.

कार्यक्रमाचे आयोजन तेली समाज संघटन, बुटीबोरी यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *