बुटीबोरीतील रस्त्यांचेहोणार रुंदीकरण

पावणे तीन कोटीच्या निधीतून विकास कामे

बुटीबोरी, वार्ताहर. शहराचा मुख्य मार्ग म्हणजे उमरेड शहराला जोडणारा महत्वाचा दुवा असून या मार्गावरील ग्रामीण क्षेत्राची एकमेव बाजारपेठ म्हणून देखील बुटीबोरी शहराची ओळख आहे. शिवाय बुटीबोरी शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने पूर्वीच्या काळी बांधकाम करण्यात आलेल्या या मार्गावरील वाहतुकीची समस्यां लक्षात घेत बुटीबोरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी पाठपुरावा करून 2022-23 मधील व्यशिष्ट्यपूर्ण योजना तसेच नागरिक सुविधा योजनेअंतर्गत एकूण 2 कोटी 69 लाख रुपयांचा निधी मंजूर केला.या निधीतून समीर जयस्वाल यांचे घरापासून ते जगनाडे चौक तसेच जगनाडे चौक ते उमरेड बाय पास रोड नजीकच्या साई ताज चौक इथपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण, रस्ता दुभाजक आणि मार्गावरील विद्युत खांब असे बांधकाम करण्यात येणार आहे. या बांधकामाचे भूमिपूजन रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाणे तसेच हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांच्या हस्ते करण्यात आले असून हे बांधकाम लवकरच पूर्णत्वास करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष गौतम यांनी दिली आहे. यावेळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती अविनाश गुर्जर, शिक्षण सभापती विनोद लोहकरे, जेष्ठ नगरसेवक प्रवीण शर्मा, माजी जि. प. सदस्य आकाश वानखेडे, विकास व नियोजन सभापती अरविंद जयस्वाल, पाणी पुरवठा विभागाचे माजी सभापती मंदार वानखेडे, आरोग्य सभापती अनिस बावला, महिला व बालकल्याण सभापती संध्या आंबटकर यांच्यासह समस्त नगरसेवक तथा नगरसेविका आणि नगर परोषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलकुंदे व नगर अभियंता अभय गुटाळ आणि शहरातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *