सुष्टीने रोवला बुटीबोरीच्या शिरपेचात मानाचा तुरा

सुष्टीने रोवला बुटीबोरीच्या शिरपेचात मानाचा तुरा

हरियाणा राज्यातील जिंद जिल्ह्यात पटकाविला प्रथम क्रमांक नवोदय विद्यालयात सृष्टी सुरूशे प्रथम बुटीबोरी, ता. १:

नुकत्याच जाहीर झालेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या बुटीबोरीतील निकालामध्ये सृष्टीने हरियाना राज्यातील जिंद जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. गजराज सोसायटीमधील कु. सृष्टी संजय सुरूशे ही सत्र २०२२-२३ ला हरियाना राज्यातील जिंद जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय येथे शिक्षण घेत होती.

जिद्दीच्या बळावर सृष्टीने अत्यंत खडतर परिस्थितीतून नेत्रदीपक यश मिळवून बुटीबोरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. सृष्टीने प्राथमिक शिक्षण बालाजी कॉन्व्हेन्टमधून घेतले. जवाहर नवोदय विद्यालयातील प्राचार्य व शिक्षकांनी सृष्टीचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *