बुटीबोरीच्या रुग्णालयात कॅन्सरग्रस्त महिलेवर शस्त्रक्रिया

बुटीबोरी हृदयाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या महिलेवर निःशुल्क यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात बुटीबोरी येथे असलेल्या माया हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश प्राप्त झाले.
सुनंदा भीमराव झोड (४४) रा. बोरवघड, ता. धामणगाव, अमरावती असे या महिलेचे नाव आहे. गत दीड वर्षापासून पाठीत व कानाच्या दुखण्याचा त्रास होता.

यवतमाळ येथील एका रुग्णालयात कानाची तपासणी करण्याकरिता गेली असता डॉक्टरांनी तिला इको करण्यास सांगितले. इकोच्या तपासणी अहवालात तिला हृदयाच्या कॅन्सर असल्याची माहिती देण्यात आली. डॉक्टरांनी या आजारावर शस्त्रक्रिया करण्याकरिता दोन लाख रुपयांचा खर्च सांगितला.

घरची परिस्थिती बेताची असल्याने शस्त्रक्रियेचा खर्च झेपणारा नव्हता. डॉक्टरांनी महिलेला बुटीबोरी येथील माया हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनेतून निःशुल्क शस्त्रक्रिया होत असल्याचे सांगितले. त्यानुसार सुनंदाच्या मुलाने बुटीबोरी येथे उपचारासाठी दाखल केले. तिच्यावर येथे डॉ. प्रशांत देवतळे, डॉ. माया देवतळे आणि कॉर्डियालॉजिस्ट चमूने यशस्वी शस्त्रक्रिया केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *