BUTIBORI

कामगार कल्याण केंद्र बुटीबोरी
आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न

कामगार कल्याण केंद्र ,बुटीबोरी द्वारा महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळ येथील नोंदणीकृत कामगार करिता आरोग्य संरक्षण करण्या करिता काळाची गरज लक्षात घेता दुर्गा मंदिर बुटीबोरी येथे मा. नंदलाल राठोड सहाय्यक कल्याण आयुक्त व मा. प्रतिभा भाकरे कामगार कल्याण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मा. सुधर्मा खोडे केंद्र संचालक यांच्या आयोजनात.

ayanshtvs butibori


स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन धर्मादाय हॉस्पिटल खापरी व यु. टी.आय. म्युच्युअल फंडच्या सहकार्याने निःशुल्क आरोग्य तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन बुटीबोरी शहराचे नगराध्यक्ष बबलूभाऊ गौतम यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे मा. विनोद लोहकरे शिक्षण सभापती, पाणीपुरवठा सभापती मा. मंदार वानखेडे , मा. संध्या आंबटकर महिला बालकल्याण सभापती, नगर सेवक मा. सनी चौहान , नगरसेविका मा. रेखा चटप , मा.विना ठाकरे , नगराळे मॅडम , व शरदभाऊ कबाडे इत्यादी उपस्थित होते.

ayanshtvs butibori


सदर शिबीर मध्ये मा. डॉ. सुनील साठवणे ,डॉ. प्रदीप जोशी, डॉ. मोहन सुरकर, डॉ. माहुरकर मा. अनिरुद्ध पांडे , मा. रोशनी समर्थ , हिमांशू निखारे व टीम यांच्या मार्गदर्शनात कामगार यांची निःशुल्क ईसीजी, शुगर, बीपी, व इतर तपासण्या करून निःशुल्क औषधीचे वितरण करण्यात आले. शिबिरात परिसरात कामगार व कुटुंबिय यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन व संचालन सुधर्मा खोडे केंद्र संचालक व आभार नंदा भोयर यांनी केले. शिबीर यशस्वी करण्याकरिता सुरेश बेलसरे, दिनेश कुटे, रिता कुटे , महाकाली फौंडेशन , मानवता सेवा संघाचे सदस्य यांनी सहकार्य केले