चुरशीच्या लढाईत राव फायटर संघ विजयी : ४ लाख रुपये व अर्जुन आमदार चषकचा मानकरी.

चषकाच्या लोकप्रियतेने गाठले शिखर : हजारोच्या संख्येने दर्शक मैदानावर

बुटीबोरी : अर्जुन सामाजिक संघटना बुटीबोरीतर्फे आयोजित ‘अर्जुन आमदार चषक क्रिकेट सामन्या’चे पर्व २० वें पर्व बुटीबोरी वासीयांकरिता यादगार ठरले.१८फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या अर्जुन आमदार चषक मध्ये रविवारी हृदयाचे ठोके वाढविणाऱ्या सामन्यात राव फायटर रायगड व गब्बर एलेव्हण त्यांच्यामध्ये डोळ्याचे पारणे फेडणारया सामन्यात राव फायटर रायगडने अर्जुन आमदार चषकवर आपले नाव कोरून फायनल सामन्यात खेळाची उच्च कोटीची प्रतभा दाखिवत दणदणीत विजय मिळविला.

बुटीबोरी मधील सुरज राव यांनी मुंबई, रायगड मधील खेळाडूना शमील करून बांधणी केलेल्या राव फायटर या विजेता संघास ४ लाख रुपये नगद धनराशी व अर्जून आमदार कप तर उपविजेता गब्बर एलेवन अकोला यास १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षिस आमदार समीर मेघे, बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता सिनेस्टार आदित्य पांचोली,

मॉडेल अँकर शीतल कनवाल तसेच स्पर्धेचे आयोजक अर्जुन सामजिक संघटनेचे अध्यक्ष बबलु गौतम, सचिव अविनाश गुर्जर, आकाश वानखेडे, पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील, मुन्ना जयस्वाल, विनोद लोहकरे, आतिश उमरे, देवराव डोईफोडे, प्रवीण शर्मा, दीपक गुर्जर, मंदार वानखेडे, सन्नी चौव्हान, अनीस बावला, प्रशांत डाहुले, सतिश जैस्वाल, नरू गौतम, मुरली पनपलिया, दिलावर खान, शफी शेख, अमजद शेख, जेऊरकर गुरुजी,वीरेंद्र गौतम, देवेंद्र टेकाडे, विशाल दुधे,

गजू राऊत, समीर बोरकुटें, भूषन बीसेन, प्रतीक तरणकंटीवार, कमलेश बोरकुटे, कुदरत सय्यद, सचिन सूर्यवंशी,पवण वाघमारे, अमित वैद्य, मनीष साहारे यांच्या हस्ते देण्यात आले. मागील १९ वर्षा पासून अविरत आयोजन होत असलेल्या अर्जून आमदार चषक मध्ये क्रिकेटप्रेमींयांची उत्कंठा शिगेला पोहचल्याचे चित्र मैदानावर दिसून आले. लोकप्रियतेचे शिखर गठित हजारोच्या संख्येने प्रेक्षक सामना पाहण्याकरीता मैदानावर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *