अर्जुन आमदार चषक क्रिकेट सामन्या चे उद्घाटन

बुटीबोरी: अर्जुन सामाजिक संघटना बुटीबोरीतर्फे आयोजित ‘अर्जुन आमदार चषक क्रिकेट सामन्या’चे उद्घाटन शनिवारी (१८ फेब्रुवारी) पार पडले. रविवार (२६ फेब्रुवारी) पर्यंत हे सामने चालेल.

या सामन्याचे उद्घाटन बुटीबोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार भीमाजी पाटील यांनी केले. अर्जुन संघटनेचे अध्यक्ष बबलू गौतम आणि उपाध्यक्ष अविनाश गुर्जर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आकाश वानखेडे, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, मुन्ना जयस्वाल, विनोद लोहकरे,

देवराव डोईफोडे, प्रवीण शर्मा, दीपक गुर्जर, अनीस बावला, मंदार वानखेडे, गजू राऊत, प्रशांत डाहुले आणि परिसरातील क्रिकेटप्रेमींची उपस्थिती होती. राजकोट, मुंबई, दिल्ली, गुजरात येथून काही टीम तर बुलढाणा,

अमरावती, अकोला, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर अशा विविध ठिकाणांहून क्रिकेट टीम येथे सामान्यासाठी येणार आहे. विजयी टीमला चार लाखांचे प्रथम बक्षीस तर द्वितीय बक्षीस एक लाख ५१ हजार रुपयांसह आमदार चषक देण्यात येणार आहे. यशस्वितेकरिता नरू गौतम, वीरेंद्र गौतम, विशाल दुधे, प्रतीक तरणकंटीवार, कमलेश बोरकुटे, कुदरत सय्यद, समीर बोरकुटेंसह संघटनेचे पदाधिकारी प्रयत्नरत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *