बुटीबोरीतील प्रथम शरीर सौष्ठव स्पर्धा 2023 पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित बुटीबोरीतील प्रथम शरीर सौष्ठव स्पर्धा 2023 पार पडली.
स्पर्धेत R.B. फिटनेस चे समीर कुंभारे यांनी प्रथम बुटीबोरी श्री म्हणून निवड करण्यात आली.स्पर्धेत 20 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. परिक्षक म्हणून अविनाश वागुळे यांनी परीक्षण केले.
प्रसंगी पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील, नगराध्यक्ष बबलू गौतम, संस्थेचे अध्यक्ष आकाश दादा वानखेडे, अविनाश गुर्जर, मुन्ना जयस्वाल, विनोद लोहकरे, मंगेश आंबटकर, महेंद्रसिंह चौहान, दीपक गुर्जर व इतर मान्यवर उपस्थित होते.
संचालन सुमित मेंढे व ऋषी जयस्वाल यांनी केले.कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी सचिन चंदेल, तुलेश ठाकरे, लोकेश मामुळकर, रुपेश इचकाते, ओम आंबटकर, नयन गुल्हाने, दीपक बन, विकी बरसागडे, अक्षय कुबेर यांनी सहकार्य केले.