बुटीबोरी येथे धम्मपरिषद संपन्न

धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समितीचे आयोजन
नागपूर/१५ ऑक्टो :- तथागत गौतम बुद्धाने दिलेला धम्म आत्मसात करून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टो १९५६ ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मक्रांती केली.तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी या म्हणीप्रणाने या धम्मक्रांतीमुळे बहुजन समाजाला सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाला.

बहुजन समाजाला सांस्कृतिक,धार्मिक कर्मकांडातून मुक्ती मिळाली.बहुजन समाजातील पुरोगामी विचाराचे पुरुष हा धम्माचा रथ समोर रेटत असताना मात्र त्यांच्या विचारला छेद देण्याचे कार्य ह्या बहुजन समाजातील स्त्रिया करीत असून आजही त्या घरातील कोपऱ्यात देव्हारा मांडून धार्मिक कर्मकांड करीत असतात.तसेच आजही बौद्ध धम्मातील स्त्रिया या हिंदू धर्मातील स्त्रिया प्रमाणे आचरण करून वैचारिक गुलामीतच आपले जीवन जगात आहे.म्हणून ज्या समाजातील स्त्रिया प्रगत तो समाज प्रगत असतो असे मत बुद्ध धम्म विचारवंत उषा बौद्ध यांनी बुटी बोरी येथील धम्मपरिषदेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.

धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समिती बुटी बोरी, सातगाव परिसर द्वारा ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्य दि १४ ऑक्टो ला धम्मपरिषदेचे आयोजन विश्वशांती बुद्ध विहार, वर्धमान नगर बुटी बोरी येथे करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी ९:०० वाजता भदंत महेंद्रा यांचे हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन,पंचशील त्रिशरन व बुद्ध वंदना ग्रहण करण्यात आली.त्यानंतर परिसरातून आलेल्या धम्मरॅलीचे स्वागत व भोजनदान करण्यात आले.

१४ ऑक्टो हा शोषित पिढीत समाजाचा मुक्तीदिन होय.म्हणून या समाजाने महापुरुषांचे जन्मदिन व महापरिनिर्वाण दिनीच त्यांना स्मरून आपल्या भावना जागृत न करता सदैव त्यांचे विचार आचरणात आणावे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली समता,स्वतंत्र,बंधुता,प्रामाणिकता,नैतिकता,नम्रता,प्रज्ञा,शील व करुणेचे पालन करून बुद्ध धम्माच्या मार्गावर चालण्याकरीता विहारात जाणे गरजेचे आहे. कारण बुद्ध विहार हे महाविद्यालचे काम करत असून ते संस्कार केंद्र असल्याचे मत डॉ अश्विनकुमार मेश्राम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषानातून केले.तत्पूर्वी आंबेडकरी चळवळीत अनेक वर्षापासून काम करणारे जेष्ठ नागरिक, बुद्ध धम्म ज्ञान परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान पटकविणाऱ्या परीक्षार्थिचा पारोतोषिक व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या तृतीय सत्रात साय ७:०० वाजता महाराष्ट्राचे प्रसिद्ध कव्वाल आकाशराजा यांचा “एल्गार भीमक्रांतीचा” यांनी बुद्ध भीम गीतांच्या तालावर सर्व उपस्थितांनी त्यांना भरभरून दाद दिली.एकापेक्षा एक सुरेल असे संगीतमय नजराने प्रस्तुत करून त्यांनी उपस्थितांची मन जिंकली.कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता धम्मचक्र प्रवर्तन उत्सव समिती बुटीबोरी, सातगाव परिसर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *