गाड्यांचा वेग ५० वरून ७५ किमी प्रति तास होणार

नागपूर : मोठ्या प्रमाणावर कोळसा वाहतुकीसाठी उपयोगात आणला जाणारा बुटीबोरी-उमरेड रेल्वे मार्ग आता अपग्रेड झाला आहे. आवश्यक त्या सुधारणा या जुन्या रेल्वे मार्गावर करण्यात आल्याने आता या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाडीचा वेग दीडपट झाला आहे. परिणामी या रेल्वे मार्गावर कोळसा वाहतुकीचे प्रमाण आणि गतीही वाढणार आहे.

उमरेडला मोठी कोळसा खदान आहे. तेथून निघणारा कोळसा विविध ठिकाणच्या उर्जा प्रकल्प आणि औद्योगिक प्रकल्पासाठी वापरला जातो. उमरेड खदानीतून निघालेला कोळसा नागपरला आणण्यासाठी रेल्वे मार्गावरून आवागमन होत होते. मात्र, या मार्गाचे नुतनीकरण केल्यास गाड्यांची संख्या, गती आणि कोळसा आणण्याचे प्रमाण वाढवले जाऊ शकते, असा निष्कर्ष काही महिन्यांपर्वी करण्यात उच्च दर्जाचे ट्रॅक टाकून मानवरहित रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करण्यात आले. अशा प्रकारे या ट्रॅकचे नुतनीकरण केल्यानंतर या मार्गावर रेल्वेगाडी ५० ऐवजी ७५ किलोमीटर प्रतितास चालविली जाऊ शकते. हे टायलनंतर