बुटीबोरी येथे शिवपुराणाला प्रारंभ

बुटीबोरीः महाशिवरात्री निमित्त शिव महापुराण व रुद्रयज्ञला प्रारंभ झाला आहे. पंडित श्यामजी मनावात यांच्या मधुर वाणीने परिसरातील असंख्य भाविक मंत्रमुग्ध झाले. शुक्रवारी दुर्गा माता मंदिर ते ओम शिव मंदिर मार्गावरून कलशयात्रा काढण्यात आली. शहरातील विविध महिला भजनी मंडळे कलशयात्रेत सहभागी झाले होते. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष किशोर गुजरकर, दिनेश इंगोले, नामदेवराव ढोणे, एकनाथ गिरनाळे, दीपक ठाकरे, चुनकाई कश्यप, शेखर गुर्वे, फुणसे महाराज, शैलेन्द्र पाटील, निखील गुजरकर, भोलाजी बुरबादे, दिनेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *