बालाजी कॉन्व्हेन्ट मधील १२०० विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

बुटीबोरी :- प्रगत देशाचा कणा म्हणजे सुदृढ बालक यामाध्यमातून ६ ते १४ वर्ष वयोगटातील प्रत्येक बालक निरोगी असावा या धोरणानुसार आर. बी. एस.के. (राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम ) सर्वत्र राबविल्या जात आहे. याच माध्यमातून बालाजी कॉन्व्हेन्ट शाळेतील जवळपास ९७५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

शुक्रवार दिनांक १३ ऑक्टोंबरला डॉ. रोहित मेहता, डॉ. नीलजा पापळकर, सारिका डांगाले व प्रविना पांडे यांनी वर्ग १ ली ते ८ इंग्रजी व मराठी माध्यम मधील जवळपास ९७५ विद्यार्थ्याची र आरोग्य तपासणी केली. प्रत्येक बालकांचे स्वस्थ = आरोग्य व सुदृढ शरीर असणे गरजेचे आहे या 7 करिता राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.

बालाजी कॉन्व्हेन्ट मराठी माध्यमचे मुख्याध्यापक निखिल साबळे सर यांच्या उपस्थिती मध्ये सकाळी १० वाजताच्या सुमारास निःशुल्क हेल्थ चेकअपला सुरुवात झाली असता बालाजी कॉन्व्हेन्ट मधील संपूर्ण विध्यार्थी या आरोग्य तपासणी करीता उपस्थित होते. डॉ. रोहित मेहता, डॉ. नीलजा पापळकर यांनी बालकांमध्ये मध्ये असणारे विकार पडताळून त्यावर योग्य उपाय योजना सुचविल्या तसेच त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले. बालकाची शारीरिक अवयवाची पडताळणी करून बालकांनी सकस आहार घेऊन दररोजच्या आहारात रुग्णांनी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश अधिक प्रमाणात करण्याचे सुचविले या प्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक निखिल साबळे, सह शाळेतील समस्त शिक्षक वृंद उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *