वटवृक्षाला फेरे घाऊन आपल्या सौभाग्याच्या दीर्घ आयुष्याची केली कामना.

बुटीबोरी :- वटपौर्णिमेचा हा दिवस हिंदू स्त्रियांकडून एखाद्या सणासारखा साजरा केला जातो.ह्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारत सूत गुंडाळत वटवृक्षाकडून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभाव म्हणून वचन घेत असतात.

butibori


वट पौर्णिमा हा सण संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाावर साजरा करण्यात आला.आज बुटीबोरी मधील महिलांनी सुद्धा आपल्या पती परमेश्वरास दिर्घ आयुष्य लाभावे या करीता वडाळा सुत गुंडाळत प्रदक्षिणा घातल्या.वडाचे विधि प्रत पूजन करून व एक दिवसाचा व्रत केला.


वटपौर्णिमे विषयी पौराणिक कथा शास्त्रात सांगितली जाते जेव्हा यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली.त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले.