बुटीबोरी:-बुटीबोरी येथे बालभारती च्या भव्य मैदानामध्ये अंबिका व्हॅलीबॉल क्लब बुटीबोरी द्वारा विदर्भ स्तरीय व्हॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन दिनाक:-२८-१२-२०२४ व दिनांक:/२९-१२-२०२४ या दरम्यान करण्यात आले होते.या स्पर्धेत विदर्भातील एकूण २० संघानी सहभाग घेतला होता.प्रत्येक संघात नावाजलेले खेळाडू होते.

या संघांपैकी ऑरेंज सिटी नागपूर,सिटी पुलीस नागपूर, रॉयल क्लब नागपूर व व्हीनस क्लब नागपूर या संघांनी सेमिफायनल मध्ये प्रवेश केला.पहिला सेमिफायनल ऑरेंजसीटी नागपूर व सिटी पुलीस नागपूर या दोन संघात खेळविण्यात आला यात ऑरेंज सिटी नागपूर संघाने सिटी पुलीस नागपुर संघाचा दोन सेट मध्ये पराभव केला.

तसेच दुसरा सेमिफायनल रॉयल क्लब नागपूर व व्हीनस क्लब नागपूर या दोन संघात खेळविण्यात आला यात रॉयल क्लब नागपूर संघाने व्हीनस क्लब नागपूर संघाचा दोन सेट मध्ये प्रभाव केला.व ऑरेंजसीटी नागपूर व रॉयल क्लब नागपूर या दोन संघांनी फायनल मध्ये प्रवेश मिळवला.तिसऱ्या पारितोषिका साठी सिटी पुलीस नागपूर व व्हीनस क्लब नागपूर या दोन संघात सामना रंगला यात सिटी पुलीस संघाने बाजी मारत व्हीनस क्लब चा दोन सेट मध्ये प्रभाव केला.

नंतर पहिल्या व दुसऱ्या पारितोषिकासाठी ऑरेंज सिटी नागपूर व रॉयल क्लब नागपूर या दोन संघात खूप घमासान पाहायला मिळाला दोन्ही संघ तोडीस तोड होते.विधुत प्रकाशात रंगलेल्या या सामन्यात ऑरेंज सिटी नागपूर संघाने उत्कृष्ट खळाचे प्रदर्शन करीत विजयश्री खेचून आणला व रॉयल क्लब नागपूर चा दोन सेट मध्ये पराभव करत पहिल्या परितोषिकाचा मानकरी ठरला व रॉयल क्लब नागपूर संघाल द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक २११११रु रोख व चषक ,द्वितीय पारितोषिक १५५५५रु रोख व चषक व तृतीय पारितोषिक १११११ रु रोख व चषक ,व या स्पर्धेत वयक्तिक पारितोषिक सुद्धा देण्यात आले होते.परितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .दोन दिवस चाललेली ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हॅलीबॉल चाहत्यांची गर्दी पाहण्यात मिळाली.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अंबिका व्हॅलीबॉल क्लब च्या सदस्यांनी खुप मेहनत घेतली.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सगळ्यांच्या योगदानाबद्दल असयोजकांनी सर्वांचे आभार मानले.