बुटीबोरी महाकाली महिला फौंडेशन बुटीबोरीच्या वतीने कामगार कल्याण केंद्र, बुटीबोरी येथील मॅडम श्रीमती नंदाताई भोयर, केंद्र महिला कल्याण सहाय्यीका या दि. ३०/०६/२२ सेवानिवृत्त झाल्या त्या निमित्ताने दि. १९/०७/२२ रोजी सेवानिवृत्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. नंदलालजी राठोड सर, सा. कल्याण आयुक्त नागपूर प्रमुख अतिथी म्हणून मा. मंदार वानखेडे, सभापती नगर परिषद बुटीबोरी, मा. प्रतिभाताई भाकरे कामगार विकास अधिकारी नागपूर,
मा. सचिन वंजारी केंद्र संचालक, सुधर्मा खोडे, केंद्र संचालक मा. शरदभाऊ कबाडे, मा. सुनिल विश्वकर्मा, दिनेश कुटे, टिकेश्वर पारधी इत्यादी उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाचे आयोजक महाकाली महिला फौंडेशनच्या मा. रिताताई कुटे, स्मिता मुटकुरे, इत्यादी सर्वं पदाधिकारी उपस्थित होते.