साथ फाउंडेशनच्या आश्रमात वृक्षारोपण

बुटीबोरी, ता. 9 : येथील जुनी वसाहतीमधील साथ फाउंडेशन संचालित स्व. भैय्याजी गुर्जर पुनर्जन्म आश्रम येथे पोलिस निरीक्षक भिमाजी पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन साथ फाउंडेशनचे संचालक प्रयाग डोंगरे यांनी केले आश्रम परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

भिमाजी पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक केले. तर संचालक प्रयाग डोंगरे यांनी उपक्रमाचे स्वागत केले.

यावेळी पोलिस निरीक्षक भिमाजी पाटील, साथ फाउंडेशनचे संचालक प्रयाग डोंगरे, स्वराज जनशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष गौरव सिंह हजारी,

सामाजिक कार्यकर्ते सतीश जयस्वाल, वाहतूक पोलिस अधिकारी रामभाऊ आडे, अमित वैद्य, प्रतिक्षा मुंदडा, मयूरी सूर्यवंशी आणि

आश्रमातील ३४ ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी वृक्षाचे संवर्धन करून त्याला वाढविण्याची प्रतिज्ञा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *