“द वॉल चषक क्रिकेट स्पर्धा 2025” उत्साहात संपन्न

बुटीबोरी : बुटीबोरी येथील अर्जुन सामाजिक संघटनेच्या ग्राउंडवर ‘द वॉल चषक’ क्रिकेट स्पर्धेचे 2025 पर्व मोठ्या उत्साहात पार पडले.

3 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत विविध संघांनी आपल्या क्रिकेट कौशल्याची चुणूक दाखवली.


या स्पर्धेत शिवशक्ती 11 संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि ‘द वॉल चषक’ आपल्या नावे केला. बाबा ट्रॅव्हल्स हिंगणा संघाने दुसरे स्थान, तर विवान इलेव्हन संघ कानोली बाराह यांनी तिसरे स्थान प्राप्त केले. विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.


या स्पर्धेचे आयोजन ‘द वॉल चषक’ केले होते, तर प्रतीक कंटीवार यांनी स्पर्धेचे प्रतीक चिन्ह अनावरण केले. कंटीवार यांनी मेडिकल असोसिएशनचे आभार मानले, ज्यांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.


या स्पर्धेने स्थानिक क्रिकेट खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली, तसेच क्रिकेट प्रेमींना रोमांचक सामने पाहण्याचा आनंद मिळाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *