टाकळघाटमध्ये देवीच्या पूजेची परंपरा कायम

टाकळघाट Butibori: देवीच्या पूजेची परंपरा आजही गावात कायम असल्याचे निदर्शनास येते. देवीच्या पूजेला गावातील बाजार चौक हनुमान मंदिर येथून सरपंच शारदा ज्ञानेश्वर शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली.

वर्धा जिल्ह्यातील वायगाव निपाणीच्या महालक्ष्मी मंदिरातून येथून देवीच्या पूजेची ओटी आणायचे. त्यानंतर माजी आमदार विजय घोडमारे पाटील यांच्याकडून पूजा काढायची व नंतर पोलिस पाटील यांच्या नेतृत्वात पूजा काढण्यात येत होती.

त्यानंतर गावाचा मुख्य माणूस हा सरपंच असल्याने ही देवीची पूजा बऱ्याच दिवसांपासून ग्रामपंचायत सरपंचांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येते. त्यानुसार ग्रामपंचायत टाकळघाटकडून गावाच्या सुख-समृध्दी साठी देवीचे पूजन करून ओटी चढविण्यात आली. महाआरती करून समारोप करण्यात आला. त्यातच महत्वाचे म्हणजे मातामाय देवीचे मंदिर गावालगतच होते.

परंतु वाढते औद्योगिकरण यामुळे मंदिराची जागा कंपन्यांनी ताब्यात घेतल्याने आज ती पूजा करायला जाण्यासाठी कंपनीच्या परवानगीची गरज असल्याचे दुःख व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी सरपंच शारदा ज्ञानेश्वर शिंगारे, उपसरपंच नरेश नरड, सदस्या राजश्रीताई पुंड, बबिताताई बहादुरे, वनिताताई चटप, श्रीमती सुधाताई लोखंडे, सुनंदाताई ठाकरे सर्व सदस्य ग्रा.पं. कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *