शेतात ठेवलेले धान्य चोरणारा ताब्यात

बुटीबोरी, ता.१४ः शेतात ठेवलेले धान्य चारचाकी वाहनातून चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळून धान्य जप्त केले आहे. दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सोनेगाव बोरी शिवारातील शेतकारी शैलेश गोविंदराव खापने व विनोद महादेव निमकर यांनी मशिनने काढलेला चणा, तूर व गहू आदी धान्य आरोपींनी चोरून नेले. धान्य चोरी गेल्याने शेतकऱ्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य पाहता तपासासाठी विशेष पथक गठित करण्यात आले. परिसराती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तपासणीत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सुनील रिखीराम राय (३९, रा. चुन्नाभट्टी रोड बरघाट, जि. शिवनी मध्यप्रदेश) यास ताब्यात घेऊन विचारपूस केली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने धान्य चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ताब्यातून २० क्विंटल चना, ६.५ क्विंटल तूर, १.५ क्विंटल गहू आणि चोरीसाठी वापरलेले वाहन, असा एकूण पाच लाख ५७ हजार २१५ रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड व पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत विशेष पथकातील अधिकारी प्रशांत लभाने, सुरेश धवराळ, आशिष टेकाम, प्रवीण देव्हारे, युनूस खान, कुणाल पारधी, दशरथ घुगरे, आशिष कछवाह, माधव गुट्टे यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *