बुटीबोरी, १३ मार्च २०२५: बुटीबोरी एमआयडीसी मार्गावर विना नदीच्या पुलाच्या आधी एका ट्रेलरचा नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात घडला. NL 02 Q 8700 हा अपघात संध्याकाळी अंदाजे ५:३० ते ६:०० च्या दरम्यान घडला.

ट्रेलर बुटीबोरीकडून एमआयडीसीकडे जात असताना अचानक नियंत्रण सुटले आणि तो डिव्हायडर ओलांडून विरुद्ध मार्गावर जाऊन कोसळला. दुर्दैवाने, त्याच वेळी त्या मार्गावरून जाणारी एक दुचाकी Mh 40 AE 6119 ट्रेलरच्या खाली आली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ट्रेलरमध्ये मोठ्या लोखंडी बीम आणि रॉड्स असल्याने ते सर्व रस्त्यावर विखुरले. तसेच, डिव्हायडरवरील मदत एक्सप्रेस लाइटही तुटून पडला. या अपघातामुळे एक बाजूचा रस्ता पूर्णतः बंद झाला आणि वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण झाला.

या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिकृत तपास सुरू आहे.