पोहण्याचा मोह अंगलट, वेना नदीत मजुर बुडाला

अपघात • एक बचावला : शोध कार्य सुरू, बुटीबोरी पोलिस ठाणे हद्दीतील घटना

बुटीबोरी . दारूच्या नशेत नदीत पोहण्यास गेलेल्या दोन मजुरांपैकी एक बुडला तर दुसरा सुखरूप बाहेर पडला. ही घटना बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी मार्गावरील वेणा नदी पात्रात शुक्रवारी दुपारी 12.30 ते 01 वा. च्या सुमारास घडली. रामकुमार पुरुषोत्तम यादव ( 34 ) रा. उर्दूला, मध्य प्रदेश आणि मुकेश लालसिंग मरसकोल्हे (27) रा. उमरवाडा, जि. शिवणी ह.मु. सातगाव असे या दोघांची नावे असून यातील रामकुमार याचा बातमी लिहितोवर शोध लागला नव्हता.

पोलिसांकडून गोताखोरांच्या मदतीने त्याचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. रामकुमार आणि मुकेश हे दोन्ही सिव्हिल काम करणारे मजूर आहेत. शुक्रवारी दोघेही कपडे धुने आणि आंघोळीच्या निमित्ताने एमआयडीसी मार्गावरच्या पुलाखालील वेना नदी पात्रावर गेले होते.

त्यावेळी दोघांनीही मद्य प्राशन केले असल्याची माहिती मुकेश याने दिली. कपडे धुणे झाल्यानंतर त्या दोघांनी सोबत आणलेले मद्य प्राशन केले. त्यानंतर रामकुमार याला नदीत आंघोळ करायचा मोह झाला. ते दोघेही पोहत असता अगदी नदीच्या मध्यभागी पोचले.

त्याना तेथील पाण्याचा अंदाज लावता आला नसल्याने रामकुमार हा पाण्यातील गाळात फसला. मुकेश याने त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात त्याला दम लागल्याने तो घाबरून पाण्यातून बाहेर पडला. घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक भीमाजी पाटील, पीएसआय मुन्नासिंग ठाकूर आणि एएसआय सुरेश धवराळ यांनी घटनास्थळ गाठले.

लागलीच गोताखोरांना पाचारण करून रामकुमार चा शोध सुरू केला. मात्र बातमी लिहितोवर त्याचा शोध लागला नव्हता. घटनास्थळी पोलिसांचे शोधकार्य सुरू असून पुढील तपास बुटीबोरी पोलिस करीत आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *