नंदी पोळ्याचा माध्यमातून चिमुकल्यांनी जपली संस्कृती.
बुटीबोरी (नीतीन कुरई) :- सणाची चाहूल लागताच संपूर्ण वातावरण आनंदमय होताना दिसून येते पोळा हा सण शेतकऱ्यांन करिता जरी सर्वात मोठा असला तरी या सणाची विषयी लहान मुलांन मध्ये सुध्धा मोठी हुर हूर दिसून येते.
नंदी पोळ्याचे औचित्य साधून बुटीबोरितील बालाजी कॉन्व्हेंट शाळेमध्ये इंग्रजी माध्यम मधील विद्यार्थ्यानी आज २ सप्टेंबर सोमवारला तान्हा पोळा हा सण मोठ्या उत्साहने साजरा केला.नंदीपोळा निमित्त वेशभूषा स्पर्धा,नंदी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या लहान लहान चिमुकल्यानी वेगवेगळी संस्कृती दर्शवणारी वेषभूषा परिधान करून आपल्या मराठी संस्कृतीचे जतन केले व आपल्या नंदीबैलाची रंगरंगोटी करून त्यांना सजून सकाळी शाळेत आणले.
या शालेय पोळ्यात दोनश्याहून अधिक लाकडी नंदी आले असता छोट्या नंद्या पासून तर ३ फूट उंची पर्यंतचे नंदी बैल या ठिकाणी मुलांनी आणले होते.सजवलेल्या लाकडी नंदीबैलाची पाहणी करून व परिधान केलेल्या वेशभूषाच्या आधारावर मुख्याध्यापक जयश्री टाले मॅडम व शिक्षक वृंदानी विद्यार्थ्यांची पाहणी केली व विध्यार्याना बक्षिसे व खाऊ देण्यात आला.
याप्रसंगी शाळेतील गौरी सोनकुसरे,निता खैरकर,शिल्पा शेबे,महिमा दाहत,शुभांगी कावळे,नेहा गायकवाड, रुपाली मुखर्जी,पायल कानफाडे,प्रणाली वरघने,ज्योती बोपचे,प्रिया भुजाडे,श्वेता जाधव,मीनल नरड,दीपा ठाकरे व नंदिनी तराळे मॅडम किशोर सावरकर,व अमर सर उपस्थित होते.