बुटीबोरीत गुरुपौर्णिमा निमीत्त श्री साईंचा गजर
विविध कार्यक्रमांनी दुमदुमला परिसर
बुटीबोरी शहर प-गुरूंप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने बोथली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या साई पार्क मधील साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव समिती बुटीबोरीच्या वतीने आयोजक प्रकाश नागपुरे, वृंदा नागपुरे, अमेय नागपूरे,भाग्यश्री नागपुरे तसेच समस्त मित्र परिवाराच्या पुढाकारातून तीन दिवशीय गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
१२ july रोजीपासून सुरू झालेंल्या या समारोहाला माजी मंत्री रमेशचंद्र बंग,सुनील केदार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश वाधवाणी तसेच जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांची विशेष उपस्थिती लाभली होती.दरम्यान तीन दिवसांच्या उत्सवात नियमित आरती,भजन,कीर्तन आदी कार्यक्रमांच्या सुराने परिसरात आंदनमय वातावरण बघायला मिळाले.१३ जुलै रोजी ढोल ताशांच्या गजरात श्री साईंच्या पालखीची भव्य रथयात्रा काढण्यात आली.
प्रसंगी साई नामांच्या गजराने अख्खा परिसर दुमदुमला होता.यावेळी या पालखी सोहळयात हजारो भाविक सहभागी झाले होते.१४ जुलै रोजी माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते श्री साईंची धूप आरती करून परिसरातील इयत्ता १० वि आणि १२ वितील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करत भावी वातचलीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कृषी उतपन्न बाजार समितीचे सभापती अहमदबाबू शेख,पंचायत समितीचे उपसभापती संजय चिकटे,बोथली ग्रा.प.सदस्य ममता बारंगे आदी मान्यवर उपस्थित होते. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.