
बुटीबोरी. स्व किशोर भाऊ वानखेडे यांच्या जयंती निमित्त स्व किशोर भाऊ वानखेडे बहुउद्देशीय संस्था तर्फे आयोजित विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण व आ नचले 2023 एकल नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी आज दिनांक जाणे 2023 रोजी आई लॉन प्रभाग क्रमांक 7 बुटीबोरी येथे पार पडला.

स्पर्धेत 84 स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यापैकी 13 स्पर्धकांची अंतिम फेरी करिता निवड करण्यात आली होती. स्पर्धेत प्रथम पुरस्कार मैथिली पांडे, वणी, द्वितीय पुरस्कार संयुक्ता ढवळे तृतीय पुरस्कार मयुरी धोपटे व 3 स्पर्धकांनी प्रोत्साहन पुरस्कार पटकावले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून अलिस्टर अँथोनी व सूचना बंगाले उपस्थित होते. प्रसंगी रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाळजी तुमाने, संस्थेचे अध्यक्ष आकाश दादा वानखेडे, नगराध्यक्ष कालू भाऊ गौतम, उपाध्यक्ष अविनाश गुजर, बुटीबोरी नगरपरिषदेचे सर्व सभापती व नगरसेवक उपस्थित होते.

संचालन सुमित मे व ऋषी जयस्वाल यांनी केलं. चित्रकला स्पर्धा मध्ये प्रथम पुरस्कार सवेद कबाडे, द्वितीय पुरस्कार रोशनी घाटे, तृतीय पुरस्कार स्नेहा ठाकरे यांनी पटकावले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता
सुमित मेंढे, महेश पटले, सचिन चंदेल, ऋषी जैस्वाल, अक्षय कुबेर, अंकित भोवर, विनोद मोहोड, दीपक बन, रुपेश इचकाटे, नयन गुल्हणे, हरीश क्षीरसागर, तेजस भोयर, ओम आंबटकर, विक्की बारसागडे, पार्थ वानखेडे, अंकुश चतुर्वेदी, सफल रामटेके, पाणी पुरवठा व मलनिस्सारण सभापती मंदार.

