Sanket jewelers group photo

‘माऊली’ ने दोनशे महिलांचा वाढविला आत्मसन्मान

*१५१ सुहासिनींचे स्नेहभोजन*

*संकेत ज्वेलर्सचा लकी ड्रा द्वारे सहयोग*

बुटीबोरी शहर प्रतिनिधी-चुलीच्या कारभाराची बिस्ता सांभाळणाऱ्या गृहलक्ष्मीला आपात्कालीन वेळेत कुणासमोर हात पसरविण्याची वेळ येऊ नये आणि त्यांना आत्मसन्मानाने जगता यावे याकरिता बुटीबोरी मधील चंदा राखुंडे,कविता बुरडकर आणि आरती गावंडे या तीन महिलांनी पुढाकार घेतला.घरच्या कर्त्या व्यक्तीच्या तुटपुंज्या मिळकतीत संसाराच्या गाड्याला हातभार लावण्याची इच्छा असणाऱ्या १५ महिलांना एकत्र करून त्यांना समाजात आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी माऊली सेवा समिती नावाच्या बिगर व्यवसायी बचत गटाची सुरुवात केली.

           गटातील या महिलांनी आपल्या कुटुंबाच्या मासिक खर्चात थोडीफार काटकसर करून गटाने ठरवलेली रक्कम जमा करणे सुरू केले.गरजेनुसार गटातून हवी असलेली रक्कम मदत म्हणून घ्यायची आणि समितीला १ टक्का अनुदानाच्या मदतीसह ती परत करायची.

वर्षाअखेरीस हिशेब करून जमा झालेली अनुदानित रक्कम ही आपसात वाटून घ्यायची.कालांतराने महिलांना या गटाचे महत्व पटायला लागले.समितीच्या माध्यमातून त्यांचा पैसा त्यांच्याच अडचणीच्या वेळी कामी यायचा.कोरोना काळात कुटुंबाच्या आर्थिक संकटाला न घाबरता संकटाला तोंड देण्यास त्या समर्थ ठरल्या.पाच वर्षांपासून समिती महिलांना स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी धडपड करीत असून आज त्यांच्यासोबत दीडशेवर महिला जुळल्या असून त्या अडचणींच्या वेळी कुणाकडेही हात पसरवीत नाही.पाच वर्षातील महिलांचे समाधान बघून समितीने त्यांच्या सन्मानार्थ स्नेहमीलनाचे आयोजन केले.प्रसंगी या सोहळ्यात बुटीबोरी नगर परिषदेच्या महिला व बाल विकास सभापती संध्या आंबटकर,सामाजिक कार्यकर्त्या राखी जयस्वाल,भावना सवाने यांच्या प्रमुख उपस्थितीत १५१ सुहासिनिंचे स्नेहभोजन करण्यात आले.महिलांच्या विकासासाठीची समितीची धडपड बघून त्यांनी समितीचे कौतूक केले.

*समितीचे धेय्य*

या स्पर्धेच्या युगात शिक्षित आणि अल्पशिक्षित महिलांना लघू व गृहउद्योगाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी या समितीची चळवळ सुरू असून महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्याबरोबरच रोजगार निर्मिती करून इतर महिलांचे सक्षमीकरण करण्याचे धेय्य माऊली सेवा समितीचे असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे.

*संकेत ज्वेलर्स चा सन्मानार्थ सहयोग*

समितीच्या या चळवळीत आपला पण सहभाग असावा या हेतूने स्थानिक संकेत ज्वेलर्सच्या वतीने महिलांसाठी या सोहळ्यात लकी ड्रॉ उपक्रम घेत भाग्यवान महिलांचा तसेच इतर महिलांचा सन्मान वाढविला. ज्यात या लकी ड्रा मध्ये माधुरी पाटील यांना १ ग्राम सोन्याचे मंगळसूत्र,

हर्षा ठवकर यांना ७ ग्राम चांदीचे नाणे,आशा नेवारे यांना ४ ग्राम चांदीचे नाणे,पंचफुला माहुरकर यांना मोत्याचा हार,विजया दाणी आणि वंदना काकडे यांना ठुसी यासारखे दागिने मिळाले.संकेत ज्वेलर्सच्या सहयोगाकरिता समितीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला

.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *