बुटीबोरी : ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहात संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांचे अनेक प्रश्न व प्रश्नांचा उलगडा कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक ठिकठिकाणी होत असते. साथ फाऊंडेशन संचालित बुटीबोरी मधील जुनी वसाहत येथील वेणा नदीच्या काठावर स्थित पुनर्जन्म आश्रम या ठिकाणी ८ मार्च जागतिक महिला दिन साथ फाऊंडेशन व सखी मंच बुटीबोरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात महिला दिनाचे औचित्य साधुन समाजाप्रती विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ज्यामध्ये HIV ग्रस्त मुलांन करिता गोकुळ आश्रम च्या माध्यमातून नवजीवन प्रदान करणाऱ्या गुंजन गोळे, UPSC व MPSC मध्ये अनेकदा अपयश येऊन वडिलांच्या निर्णयाला झुगारून पोलीस उपविभागीय अधिकारी बनणाऱ्या पुजा गायकवाड, महिलांच्या सुरक्षितता करिता रात्र दिवस काम करणाऱ्या संवेदना फाऊंडेशन च्या संस्थापिका शबिना शेख, पुनर्जन्म आश्रम मधील बेघर, निराधार आजी आजोबांना तरुण वयात सेवा देणाऱ्या मयुरी सुर्यवंशी यांचा अनुक्रमे समावेश आहेत. सोबतच महिलांन करिता 1 मिनिट शो व आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा उज्वला लोहकरे मुख्याध्यापिका पुरुषोत्तमराव खापर्डे विद्यालय बुटीबोरी, उदघाटक गुंजन गोळे संचालक गोकुळ आश्रम तपोवन, प्रमुख अतिथी DYSP पूजा गायकवाड पोलीस उपविभागीय अधिकारी नागपुर ग्रामीण, डॉ.सौख्या वाटमोडे वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र टाकळघाट, श्रद्धा येंगडे शहर समन्वयक नगर परिषद बुटीबोरी, शबिना शेख संस्थापक संवेदना फाऊंडेशन नागपुर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात गुंजन गोळे यांनी महिला व मुलींच्या आयुष्यावर माहिती दिली तर DYSP पुजा गायकवाड यांनी कायदेविषयक ज्ञान देऊन महिलांना संबोधित केले.
कार्यक्रमाचे संचालन सखी मंच च्या लता देशमुख यांनी, प्रास्ताविक साथ फाऊंडेशन चे प्रयाग डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता साथ फाऊंडेशन व सखी मंच बुटीबोरी च्या सर्व सदस्यांनी श्रम घेतले.