बुटीबोरी :- साथ फाऊंडेशन द्वारा संचालित बेघर,निराधार लोकांचे पुनर्वसन करणारे स्व.भय्याजी गुर्जर पुनर्जन्म आश्रम हे बुटीबोरी जुनी वसाहत येथे असून आज या आश्रम ची प्रचिती संपूर्ण विदर्भात पसरली आहे.आजतोवर अनेकांना या आश्रमनी सहारा देऊन त्यामधील कित्येकांना स्वगृही पाठविले आहेत.ज्यांचे घर, परिवार नसतो त्या बेघर,निराधार व्यक्तीला इथे सर्व सुविधेसह सहारा दिला जातो.आज आश्रयित्यांची संख्या ३० च्या वर पोहचली आहे त्यामुळे या छोट्याशा आश्रमाचे आज जिल्ह्याभर नाव पसरत आहेत.
आज दिनांक १७ ऑक्टोंबरला नागपूर परिसरामध्ये विविध ठिकाणी भीक मागून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या ९ वयोवृद्ध छत्रपती होले (61), राजु लाटकर (65), किसान शाहू (70), शरद शंभरकर (79), रणजित शाहू (70), पितृष लकडा (62), हिम्मत वानखेडे (75), यशवंत वाघाडे (69), आनंदराव नाईक (80) या व्यक्तींना आज नागपूर महानरपालिका व नागपूर पोलीस यांच्या मदतीने बुटीबोरी पुनर्जन्म आश्रम येथे सोपविण्यात आले.
बुटीबोरी येथील निराधार,बेघर लोकांचे पुनर्वसन करणाऱ्या पुनर्जन्म आश्रम बद्दल महानगरपालिका मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी आश्रम गाठले व पुनर्जन्म आश्रमचे संचालक प्रयाग डोंगरे यांना या वृध्द भीक मागणाऱ्या व्यक्तींची माहिती दिली व यांना आश्रम मध्ये निवारा देण्यास विनंती केली. प्रयागने सर्व हकीकत जानल्यावर कायदेशीर रित्या कार्यवाही करून आज या सर्व गरजू व्यक्तींचे पालकत्व स्वीकारून साथ फाऊंडेशनच्या माध्यमातून सहारा देण्याचा निश्चय केला.
कोट :- प्रयाग डोंगरे (संचालक पुनर्जन्म आश्रम )
आजी आजोबांचे पुढील जिवन सुखकर कसे जाईल हाच आमचा प्रयत्न राहील. दैनंदिन जीवनामध्ये अनेक वृद्ध रोडच्या कडेला, बस स्थानकावर येणाऱ्या जाणाऱ्यांन समोर स्वतःच्या पोटाची भुक भरविण्याकरिता हात पसरवितांना पाहायला मिळतात. हे सर्व दृश्य समोर ठेवून साथ फाउंडेशन च्या माध्यमातून पुनर्जन्म आश्रम या नावाने बेघर, निराधार व्यक्तींच्या राहण्याची व्यवस्था करण्याकरिता बेघर निवाऱ्याचे निर्माण केले आहे. समाजात अनेक लोकान मध्ये सहकार्याची भावना असते. त्यांना फक्त एखाद्या व्यासपीठाची गरज असते. आज साथ फाऊंडेशन ते व्यासपीठ बनून मोठ्या प्रामाणिकपणे अनेकांच्या सहकार्याने व सहयोगाने पुनर्जन्म आश्रमचे निर्माण करून बेघर, निराधार लोकांना सहारा देत आहेत.