नागपूर हिंगणा तालुक्यातील सातगाव ग्रामपंचायतींच्या वतीने त्रिमूर्ती हनुमान मंदीर येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या वेळी गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुनर्वसीत सातगाव कृती विकास समितीची स्थापना करण्यात आली. विषेश म्हणजे या परिसरातील एकुण सात गाव हे रामा डॅम या प्रकल्पात गेल्याने बुट्टीबोरी च्या बाजूला तुरकमारी मौजा येथे या सात गावांचे पुनर्वसन करण्यात आले, परंतु हे करत असताना नागरी सुविधा मात्र पुरवण्यात आल्या नाहीत यामध्ये रिधोरा, कन्हाळगाव, बोरगांव, जयपूर, म्हसाळा, किन्हाळा व दुधाळा या गावांचा समावेश आहे. नळ पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत कार्यालय, पथ दिवे, बंदिस्त गटारे, गावठाणाच्या भावी विस्तारासाठी जमीन,क्रिडांगणे, अंगणवाडी इमारती, पशुवैद्यकीय दवाखाना, धार्मिक स्थळे, समाज मंदिरं, दफनभूमी, गावठाण अंतर्गत डांबरी किंवा सिमेंट रस्ते, आरोग्य सुविधा या सगळ्या विकासात्मक बाबी गावं पुनर्वसीत करत असताना पुरविल्या गेल्या नसल्याने बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो त्या करीत हि समिती या बाबींचा शासनाकडे पाठपुरावा करेल या समीती मध्ये अध्यक्ष अरुण भोयर, सल्लागार वामनराव सातपुते उपाध्यक्ष भैयाजी राऊत, सचिव सुधाकर धामंदे, सहसचिव योगेंद्र धांडे, कोषाध्यक्ष सतिश शेळके संघटक योगेश सातपुते, सदस्य डोमाजी वाटकर, अभिनव लोखंडे, कमलाकर तुरणकर, गणेश झाडे, राहुल कैकाडी, अरुण कोडापे, विकास बेलेकर, नरेश गोडघाटे, रामभाऊ मोहितकर, प्रविण महाकुलकर, बाबाराव वानखेडे, शैलेश नागपूरे, सुधाकर कोसारे, यादवराव चकोले सुरेश ठावरे इत्यादिंची नियुक्ती करण्यात आली. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त गावात मिटींग आयोजित करण्यात आली होती हे आयोजन सरपंच योगेश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या वेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्यात आली.

What you had done is right, well done.