स्वच्छता ही सेवा”अंतर्गत विवीध स्पर्धेचे आयोजन
बुटीबोरी : बुटीबोरी नगर परिषद मध्ये राष्ट्रपीता महात्मा गांधी तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती संयुक्त रित्या साजरी करून नगर परिषद तर्फ स्वच्छता ही सेवा अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा साजरा करण्यात आला. दि. २ ऑक्टोबरला सकाळी १०:३० वा राष्ट्रपीता महात्मा गांधी तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून संयुक्तरित्या महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक राजेंद्र चीखलखुंदे, अविनाश गुर्जर (माजी बांधकाम सभापती), मंदार वानखेडे माजी नगरसेवक, नेहा पोतले (स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता), घुटालजी (स्थापत्य अभियंता) प्रियांका माळी (रचना सहाय्यक), श्रद्धा वेंगडे (शहर समन्वयक), दुर्गेश खडतकर, प्रवीण कारेकर, विरू भदोरिया, मयूर फटिंग, बादल, भूषण, विनोद मसुरकर यांच्या हस्ते स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. केंद्र शासनाचा स्वच्छता पंधरवडा अंतर्गत “स्वच्छता ही सेवा” यामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचे आदेशित असतात त्याच माध्यमातून मुख्याधिकारी तथा प्रशासक राजेंद्र चिखलखुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२४ या कालावधी मध्ये बुटीबोरी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व ऍश क्विझ स्पर्धा, स्वच्छता शपथ व स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बालाजी कॉन्व्हेन्ट बुटीबोरी, होली क्रॉस, सरस्वती किसान विद्यालय शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग होता. या कार्यक्रमास नगर परिषद कर्मचारी सर्व व मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.