balaji convent

पाल्याच्या भविष्या करीता उन्हेच्या प्रखर तळाक्यात पालकांची धावपळ

ayansh tvs

नवोदय परिक्षेकरीता बालाजी कॉन्व्हेन्ट केंद्रावर विद्यार्थ्यानी लावली हजेरी.

बूटीबोरी:  दिनांक ३० एप्रिलला राज्यात अनेक ठिकाणी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा घेण्यात आली असता आज उन्हेच्या प्रखर तळाक्यात आपल्या पाल्याला परीक्षा केंद्रावर पोहचविण्यासाठी पालकांची धावपळ सुरू होती.
शाळेला सुट्टी असताना सुद्धा पालकांचा जागरूकपणामुळे आज पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यानं करीता घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय परीक्षेस विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला.बालाजी कॉन्व्हेन्ट केंद्रावर एकूण १७० विद्यार्थ्यानी परीक्षेस हजेरी लावली.सकाळी ९ वाजता पासूनच केंद्रावर विध्यार्थी येण्यास सुरुवात झाली.या परीक्षे करीता नागपूर जवाहर विद्यालय नागपूर येथील फिजिक्स लेक्चरर निलेश गजभिये यांनी सांगितले की जिल्ह्यातील एकूण १७६०६ विध्यार्यान करीता ५४ केंद्राची निवड करण्यात आली.

butibori

बालाजी केंद्रावर घेण्यात आलेली परीक्षा कुठलिही धावपळ न होता अतिशय चांगल्या प्रकारे पार पडली.परीक्षा सोडविताना केंद्रावर विद्यार्थ्याना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही.तसेचनेमणूक करण्यात आलेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भूमिका फार महत्वाची होती.
परीक्षेमध्ये कुठलीही तारांबळ उडू नये याकरिता शाळेतील मुख्याध्यापक गणेश बुटके,व निखिल साबळे सर यांनी विशेष खबरदारी घेऊन परीक्षा केंद्रावर नेमणूक झालेल्या ४० शिक्षकांना मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना दिल्या.शिक्षण अधिकारी लोखंडे साहेब यांनी परीक्षा केंद्रावर भेट देऊन पाहणी केली.