राखीव जागेवर एमआयडीसीचा कब्जा

सहायक अभियंत्यांना घेराव, भूखंड रिक्त करण्याची मागणी

बुटीबोरी. औद्योगिक परिसरतील नागरीकांकरीता राखीव ठेवलेल्या भूखंडावर एमआयडीसीकडून होत असलेल्या औद्योगिकरणाच्या विरोधात गुरुवारी (दि. 11 जुलै) बुटीबोरी एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता सचिन दाते यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव मुजीब पठाण व जिल्हापरिषदचे विरोधी पक्षनेता आतिष उमरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. बुटीबोरी एमआयडीसी ही आशिया खंडातील पंचतारांकित एमआयडीसी म्हणून ओळखली जाते. या एमआयडीसीच्या मुख्य मार्गवरून सुखळी बेलदार या गावाला जाण्याकरीता एनएमआरडीने नकाशा मंजूर करून 18 मीटरचा रस्ता मंजूर केला होता. हा रस्ता जिल्हापरिषद नागपूर यांच्या निधीतून बनविण्यात आला होता.

परंतु हा रस्ता खोदून एमआयडीसीकडून बंद करण्यात आल्यामुळे मुजीब पठाण व आतिष उमरे यांच्या नेतृत्वात सुकळी बेलदार येथील नागरिकांनी बंद केलेला रस्ता पुन्हा तसाच बनवून द्यावा, तसेच ज्या ठिकाणी शाळा, दवाखाना व नागरीकांकरीता राखीव ठेवलेल्या भूखंडवर औद्योगिकरण करू नये, करीता एमआयडीसीच्या सहायक अभियंत्यांना घेराव करून निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी महासचिव मुजीब पठाण व जिल्हापरिषदचे विरोधी पक्षनेता आतिष उमरे, टाकळघाटचे उपसरपंच उमेश कावळे, युसूफ शेख, नागेश गिहे, तुषार ढाकणे, विकास वारे, विनोद टेंभुरकर, नाना परतेकी, जिमी खान,

टाकळघाटचे ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र येसनसुरे, शेखर इंगोले, मधुकर खोडे आदी उपस्थित होते. या समस्येवर तात्काळ गांभीर्याने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *