न्यू व्हिजन संघ चषकाचा मानकरी

श्रीमती सरस्वतीबाई निस्ताने स्मृती प्रित्यर्थ कबड्डी स्पर्धा

टाकळघाट : साई क्रीडा मंडळाच्या वतीने टाकळघाट येथे आयोजित खुल्या कबड्डी स्पर्धेत बुटीबोरी येथील न्यू व्हिजन कबड्डी संघ अत्यंत चुरशीच्या सामन्यात जय बजरंग क्रीडा मंडळावर मात करून ‘श्रीमती सरस्वतीबाई निस्ताने चषकाचा मानकरी ठरला. माजी आमदार विजय (पाटील) घोडमारे यांच्या आत्या श्रीमती सरस्वतीबाई निस्ताने यांच्या स्मृती प्रित्यर्थ घोडमारे यांचे चिरंजीव अंशुल विजय घोडमारे यांच्या संकल्पनेतून आजीच्या कर्तृत्वाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ग्रामस्थांच्या सहकार्याने दोन वर्षापासून कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

स्पर्धेचे उ‌द्घाटन माजी मंत्री रमेश्चंद्र बंग यांच्या हस्ते माजी आमदार विजय घोडमारे यांच्च्या प्रमुख उपस्थित झाले. स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातून ६४ चमूंनी सहभाग नोंदविला. अंतिम सामान्याची लढत चुरशीची झाली. जय बजरंग क्रीडा मंडळावर ३३-३१ गुण फरकाने बुटीबोरी येथील न्यू व्हिजन क्रीडा मंडळाच्या चमूने बुटीबोरी येथील न श्रीमती सरस्वतिबाई निस्ताने चषकावर नाव कोरले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी साई क्रीडा मंडळाचे सदस्य हिमांशू कानतोडे, रोशन ठाकरे, उमेश येगाडे, वेदांत सुर्यवंशी, साहिलडायरे, पवन लाजूरकर, अभि बहादुरे, ग्रा. पं. सदस्य वेदांत वासाड, अतुल कडू, सामाजिक कार्यकर्ता व माजी ग्रामपंचायत सदस्य नाना शिंगारे, संजय मेश्राम, प्रमोद चौधरी, पंजाब भुजाडे, रामदास पुंड, उमेश बांगरे, अविनाश दिगडे, पुरुषोत्तम नवले व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

जय बजरंग चमू टाकळघाट उपविजेता
विजेत्या बुटीबोरी संघाला अंशुल घोडमारेकडून २१००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. उपविजेता जय बजरंग टाकळघाट संघाला टाकळघाटच्या सरपंच शारदा शिंगारे यांचेकडून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक १५००० रोख व स्मृतिचिन्ह देण्यात आले. १० हजार रुपयाचे तृतीय पुरस्कार श्रीकृष्ण क्रीडा मंडळ, धोकूरडा चमूला जे व्ही टी ट्रान्सपोर्टकडून तर, ५ हजार रुपयाचा चतुर्थ पुरस्कार जय बजरंग क्रीडा मंडळ, टाकळघाटला न्यू बांगरे ज्वेलर्सकडून देण्यात आले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *