बुटीबारी, ता. १२ः महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार करणाऱ्या राजमाता, माँसाहेब जिजाऊ भोसले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच समाजसुधारक, तत्त्वचिंतक आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांनाही जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
येथील बालाजी कॉन्व्हेंट, कनिष्ठ
महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य दीपा हरतालकर कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या तर नागपूर येथील सेवासदन अध्यापक विद्यालयाच्या यशोदाबाई खरे, प्रा. भागवत भांगे, प्राचार्य प्रवीण भोयर, शिक्षक चक्रधर डेहनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रा. भांगे, डेहनकर यांनी मनोगत व्यक्त केले. पायल लांजेवारने जिजाऊ तर शंतनू या विद्यार्थ्याने विवेकानंद यांच्या वेशभूषेत मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रीती मोरे यांनी केले.