भेटला विठ्ठल, माझा भेटला विठ्ठल !

बुटीबोरी, ता. १० : ज्यांचे पंढरपुरात जाणे शक्य नाही, त्यांची उपस्थिती बुटीबोरी स्थानिक परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पाहायला मिळाली. आषाढी एकादशीनिमित्त जागृत विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अनेक भक्तांची गर्दी दिसून आली. कोरोनाच्या अडसरानंतर यंदाची एकादशी भाविकांसाठी उदंड उत्साहाची ठरली. विठ्ठलाचे दर्शन घेण्याकरिता दूरवरून आलेले भक्त या मंदिरामध्ये एकत्र जमले. यंदा एकादशीच्या दिवशी भाविकांची उसळणारी गर्दी विचारात घेऊनच मंदिरांच्या वतीने नियोजन केले जाते आहे.