बुटीबोरी: भावी पिढी सुदृढ व सक्षम तयार व्हावी, याकरिता नॅशनल कॅडेट कोर्स हा अतिशय महत्त्वाचा आहे व एनसीसी कोर्सचा अनेक विद्यार्थ्यास निश्चितच लाभ मिळत आहे. स्वयं शिक्षणाची ओढ, स्वयंरक्षणाचे गुण माध्यमातून विद्यार्थ्यांच्या रुजविण्याकरीता सरस्वती किसान विद्यालय शाळा व तेथील एनसीसीचे शिक्षक मनोज केने गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशिल आहेत.
त्यांच्या कार्याचा आढावा घेत २० महाराष्ट्र बटालियन एनसीसी नागपूर ग्रुपतर्फे पाइपिंग समारंभ आयोजित करून यांना लेफ्टनंटची रँक (पदवी) बहाल करण्यात आली. सरस्वती किसान विद्यालयात एनसीसी ज्युनियर डिव्हिजनचे केअर टेकर मनोज केने व भिवापूर महाविद्यालयचे केअर टेकर योगेश मोरे यांना एएनओ असोसियेट एनसीसी ऑफिसर यांनी त्यांना पदोन्नती देऊन लेफ्टनंट अशी रँक दिली.