बुटीबोरी, ११ एप्रिल २०२५: येथील चौधरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि सन्मानाने साजरी करण्यात आली. रुग्णालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

दुपारी २ वाजता रुग्णालयाच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रुग्णालयाचे संचालक डॉ. रमण चौधरी व डॉ. प्रीती चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून चिरकाल सत्य साप्ताहिक व दैनिकाचे संपादक श्री. सुभाष राऊत गुरुजी उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांवर, त्यांनी शिक्षण आणि समाजसुधारणेसाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की महात्मा फुले यांचे विचार आजही समाजासाठी किती प्रासंगिक आहेत.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राजूभाऊ गावंडे, डॉ. भीमराव मस्के, श्री. सुधीर देवतळे, श्री. आशिष वर्धने , श्री. संजय भुमरकर, श्री संजू चिकटे माझी पंचायत समिती सदस्य, डॉ महांकाळकर, संजय ठाकरे, अल्फाज शेख , रजत वर्गने, महाकाली फाउंडेशनच्या अध्यक्ष रिटा कुठे व अन्य मान्यवर यांची उपस्थिती लाभली. या मान्यवरांनीही महात्मा फुले यांच्या कार्याला उजाळा दिला आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
चौधरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकी जपत या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. महात्मा फुले यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा आणि समाजात शिक्षण व समतेचा प्रसार करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. बुटीबोरी आणि परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली.