बुटीबोरी: महाकाली महिला फाउंडेशनने आज साईनगर MIDC मैदानावर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नगर परिषदचे कार्यकारी मुख्य अधिकारी राजेंद्र चिखलखुदे होते.
या कार्यक्रमात फाउंडेशनच्या अध्यक्ष रिता कुटे यांनी 50 झाडांची लागवड करून वृक्षारोपणाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडांचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमात बीएमए अध्यक्ष किशोर मालवी, माझी अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल बी एम ए अध्यक्ष एमआयडीसी बुटीबोरी , माजी अध्यक्ष नितीन लोणकर बी एम ए नगर परिषदेचे उपाध्यक्ष अविनाश भाऊ गुजर,
माजी सभापती मंदार भाऊ वानखेडे, पर्यावरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वडे, केंद्र संचालक कामगार कल्याण केंद्र बुट्टी बोरी जीवनजी घिमे, पेस वुड कंपनीचे जनरल मॅनेजर प्रवीण नाईकवाडे, ई सी बी एम ए संजय नगुलवार, बी एम एचे सेक्रेटरी शशीन अग्रवाल, जे .इ एमआयडीसी अंकुश गोटे, वेनेग्र डायरेक्टर रुचिर गुप्ता, देवाशिष शर्मा, महिलांच्या आरोग्यासाठी काम करणारे अनेक डॉक्टर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिता कुटे यांनी केले. यावेळी त्यांनी महाकाली महिला फाउंडेशनच्या विविध सामाजिक कार्यांबद्दल माहिती दिली. फाउंडेशनने गरीब आणि गरजू लोकांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत, ज्यात आरोग्य शिबिरे, महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, कॅन्सर शिबिरे, मोतीबिंदू शिबिरे, धान्य वाटप, दिव्यांग आणि तृतीयपंथीयांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरजूंना ब्लॉकेट वाटप, औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमात फाउंडेशनने अधिकाऱ्यांशी चर्चा करून महिलांसाठी घरगुती उद्योग सुरू करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. तसेच, कागदपत्रे नसलेल्या गरीबांना मदत करणे, निःशुल्क चष्मे वाटप आणि मोतीबिंदू ऑपरेशन आयोजित करणे यासारख्या अनेक सामाजिक कार्यांसाठी मदत करण्याची विनंती केली.
या कार्यक्रमाचे समारोप शरद भाऊ कबाडे यांनी आभार प्रदर्शनाने केले. या कार्यक्रमात गजानन भाऊ गावंडे, दिनेश कुटे, विश्वकर्मा खुशाल कोरेकर, गौरी उंबरकर, कामिनी रामटेके, सुरेखा वलके, स्मिता मुटकुरे, वैशाली धोपटे, सुमित मेंढे आणि महाकाली महिला फाउंडेशनची संपूर्ण टीम यांचा सहभाग होता.