गुरुशिवाय जीवनास पूर्णत्व नाही : जोगेंद्र कवाडे

गुरु हे एका सुंदर आरशाप्रमाणे असतात, ज्यामध्ये व्यक्ती आपल्या व्यक्तित्वाची ओळख करून घेतो. गुरू हे सर्वांत मोठे मार्गदर्शक असतात. म्हणूनच गुरुचे महत्व हे शास्त्रातसुद्धा वर्णन केले आहे. शिक्षण ही अशी मजबूत शक्ती आहे जिच्या मदतीने आपण |

समाजाला सकारात्मकतेकडे बळवू शकतो आणि हे शिक्षण प्रदान करण्यामागे शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण असते, असे मत माजी आमदार जोगेंद्र कवाडे यांनी | व्यक्त केले. बुटीबोरी येथील आई सभागृहात आयोजित सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यात | उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बुटीबोरी येथील प्रबुद्ध मानव कल्याण समितीद्वारा येथील आई समागृहात सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी आरपीआय (आ) चे महाराष्ट प्रदेश अध्यक्ष भूपेश थुलकर तर प्रमुख अतिथी म्हणून बुटीबोरी नगरपरिषदचे • नगराध्यक्ष बबलू गौतम, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप खोडके,

butibori

मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष रमन चौधरी, शिक्षण समापती विनोद लोहकरे, कांग्रेस प्रवक्ता सुधीर देवतले, डॉ. देशमुख, डॉ. अशोक ताकसांडे, डॉ. आर. एस. वाने, डॉ. विजय शेळके, भाऊराव मस्के, सिद्धार्थ मस्के, भीमराव जारोडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान सेवानिवृत्त शिक्षक अशोकसिंग गौतम, देवरावजी दोईफोडे, चंद्रशेखर खडसे, चंदेल, वसंतराव बडनेरकर, पाठक आदींचा यावेळी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शेळके तर संचालन डॉ. भीमराव मस्के यांनी केले.