नागपुर, दि. १४ जुलै : नागपुर जिल्हा कैडेट आ जुनियर ओपन किकबॉक्सिंग स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा किकबॉक्सिंग स्पोर्ट्स एसोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व स्पोर्ट्स किकबॉक्सिंग एसोसिएशन नागपुर जिल्हा यांच्या सयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धेचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ शिंगारे सुषमाताई कडू (कावले) पंचायत समिति सभापति हिंगणा, शारदाताई शिंगारे सरपंच ग्राम पंचायत टाकलघाट व अचला मेसंस यांच्याद्वारे करन्यात आली.
या स्पर्धेत नागपुर जिल्ह्यातील १२० खेळाडूनी सहभाग घेतला होता. त्यात निस्ताने स्कूल टाकलघाट सुशील सूर्यवंशी १ गोल्ड, नैतिक वणकर २ गोल्ड, आदित्य थोटे २ गोल्ड, सागर सोनी १ गोल्ड १सिल्वर, विधि ठवकर २ गोल्ड, वैदही डबुरकर १ सिल्वर, स्नेहल कुरकुटवार गोल्ड, अक्षरा कुरकुटवार १ सिल्वर,
चंचल कुरकुटवार १ सिल्वर, सनराइज स्कूल टाकलघाट मधील अमन मोहबे २ गोल्ड, रोहन उजवलकर १ गोल्ड १ सिल्वर, प्रियांशु बोरकर १ गोल्ड १ सिल्वर, साहिल टेंभुरकर २ गोल्ड, प्रिंस चौहान १ सिल्वर १ ब्रॉन्ज, गुरुथोटे १ गोल्ड, जानवी ढवले १ गोल्ड, विधि गोडघाटे १ ब्रॉन्ज, सेंटर प्वाइंट स्कूल बूटीबोरी मधिल श्रुति रिनके ३ गोल्ड, आकांक्षा यादव २ गोल्ड १ सिल्वर,
आरोही रिनके २ गोल्ड, संकेत शेंदरे १ गोल्ड १ सिल्वर, केडीके स्कूल सातगांव मधिल किंजल शहारे १ गोल्ड, न्यू प्रेरणा कॉन्वेंट , टाकलघाट मधिल हितेश राउत १ गोल्ड हे सर्व खेळाडू प्रशिक्षक सुधीर रिनके अध्यक्ष स्पोर्ट्स किकबॉक्सिंग एसोसिएशन नागपुर जिल्हा यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करत होते. विद्यार्थ्याने आपल्या यशाचे श्रेय पालक व प्रशिक्षक सुधीर रिनके याना दिले.