https://aamchibutiborinews.online/

कर्मयोगीने कृतीतून उभारली प्रेमरूपी गुढी

◆ मराठी नववर्षदिनी गुढीपाडव्याला २५ सायकलचे वाटप.
◆ स्वतःची जबाबदारी ओळखून काम करा. रविंद ठाकरे अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर
कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर, सत्य, सातत्य शिस्त, व समर्पण हे गुण अंगीकारून जनमानसासाठी मोठ्या प्रमाणात काम करत आहे.
कर्मयोगी कोरोना काळापासून सातत्याने महिला सक्षमीकरण हा विषय हाताळून विधवा महिलांसाठी कार्यरत आहे. विधवा ताईंच्या मुलींसाठी व विशेषतः कोरोना काळात आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलींचा शिक्षणातील उत्साह वाढविण्याकरिता व आपल्यालाही कोणाचा तरी आधार आहे ही जाणीव करून देण्यासाठी १०१ सायकल वाटपाचा संकल्प कर्मयोगीने केला आहे. या संकल्पाचे चार टप्पे पाडण्यात आले आहे.

ayansh tvs

या संकल्पाचा तिसरा टप्पा जागतिक मराठी नववर्षाला प्रेमरूपी गुढी उभारत केईसी ट्रेनिंग सेंटर बुटीबोरी येथे आई किंवा वडिलांचे छत्र हरवलेल्या गरजवंत मुलींना २५ सायकली देऊन गुढीपाडवा कृतीतून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर रविंद ठाकरे, उदघाटक महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद नागपूर उज्वला बोढारे,
प्रमुख उपस्थिती गुज्जेलवार केमिकल्स प्राइवेट लिमिटेड बुटीबोरी व्यवस्थापकीय संचालक नितिन गुज्जेलवार, वरुणा इंडस्ट्रीज बुटीबोरी
व्यवस्थापकीय संचालक शशिकांत कोठरकार, आजीवन ग्रामगीता प्रचारक रुपराव वाघ ही मंडळी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होती…
यावेळी अध्यक्षीय भाषणात रवींद्र ठाकरे म्हणाले की प्रत्येकाने आपण जेथे आहो तेथून आपली भूमिका योग्य निभावली तर आपण अनेक चांगल्या गोष्टींना न्याय देऊ शकतो. कर्मयोगी फाऊंडेशन गोरगरीब लोकांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे हे मला येथे आल्यावर प्रत्यक्षात दिसले. मी स्वतः कर्मयोगीला माझ्याकडून कसलीही मदत लागली तर मी त्यांच्यासोबत आहे. असे ते यावेळी आवर्जून म्हणाले.
उदघाटनिय भाषणात उज्वला बोढारे म्हणाल्या की कर्मयोगीच्या कार्यक्रमाला मला वारंवार यायला मिळत आहे, ते माझे भाग्य आहे. कारण कर्मयोगी महिलांना सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे. त्या म्हणाल्या की एक वेळ ईश्वराला घाबरले नाही तरी चालेल परंतु कर्माला घाबरा कारण तुम्ही जे चांगले वाईट कर्म कराल तेच तुमच्यासोबत येणार आहे..
यावेळी नितीन गुज्जेलवार यांनी कर्मयोगी फाऊंडेशनला ११ हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
या कार्यक्रमाला बापु बोढारे, सरोज मोहंता, अनिल क्षीरसागर, पत्रकार गणेश सोनटक्के, सरपंच शुभम उडान, सरपंच शेषरावजी नागमोते इतर गणमान्य मंडळी व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कर्मयोगी तर्फे सर्वांसाठी मिष्टान्न जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती..
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.