कर्मयोगीने फुलविले १०१ वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य…
★साठी ओलांडलेल्यांना दिला काठीचा आधार..
★गोरगरीब, दिनदुबळ्यांचे अश्रू पुसण्याचे काम करत आहे कर्मयोगी..
रमेशचंद्र बंग माजी मंत्री महाराष्ट्र राज्य..
कर्मयोगी फाऊंडेशनने २०२२ मध्ये ५१ गावांमध्ये वृद्ध मंडळीना आधार काठी वाटपाचा निर्धार केला आहे. त्याच अनुषंगाने “बोलते नव्हे तर कर्ते व्हा हा* या संदेश तत्वावर कोरोना नियम पाळत दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ ला त्रिमूर्ती मंदिर सातगाव तहसील हिंगणा जिल्हा नागपूर येथील १०१ वृद्ध मंडळीना आधार काठी देऊन त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमरूपी हास्य फुलविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशचंद्र बंग माजी मंत्री महाराष्ट्र राज्य , उदघाटक योगेश सातपुते सरपंच सातगाव, प्रमुख उपस्थिती प्रविणा शेळके उपसरपंच, सुधाकर धामंदे सामाजिक कार्यकर्ते सातगाव बाबाराव वानखेडे ग्रामपंचायत सदस्य हे व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात रमेशचंद्र बंग म्हणाले की कर्मयोगी फाऊंडेशन हे गोरगरिबांसाठी मोठ्या प्रमाणात काम करत आहे. ते मी अनेक वृत्तपत्रातून वाचत होतो, इतरांकडून ऐकूण होतो. त्यामुळे कर्मयोगीच्या कार्यक्रमाला जाण्याची त्यांचं कौतुक करण्याची मी वाट बघत होतो. तो योग आज आला. त्याबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले की आजच्या काळात पोटची मुले आई वडिलांचा सांभाळ करायला तयार नाहीत. प्रत्येकालाच म्हातारपण येणार आहे. म्हातारपणाच्या वेदना आपल्यालाही होणार आहे ही जाणीव सर्वांना असली पाहिजे. हीच माणुसकीची जाणीव ठेवून कर्मयोगी गोरगरिब दिनदुबळ्यांना आधार देण्यासोबतच त्यांचे अश्रू पुसण्याचे काम ते खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात करत आहे.
कामगार क्षेत्रात असतानाही त्यांनी आपली जबाबदारी समजून कोरोना काळात सुद्धा मोठया प्रमाणात काम केलं व ते सतत करत आहेत हे येथे वाखण्याजोगे आहे, त्यांना या कार्यात अधिक यश मिळावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे ते आवर्जून म्हणाले..
यावेळी रमेशचंद्र बंग यांना कर्मयोगी फाऊंडेशन कडून शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी यशस्वी मेहनत घेतली. butibori news today midc