karmayogi foundation butibori midc news

कर्मयोगीने जपली रतन टाटा यांच्याप्रती कृतज्ञता (butibori midc news)

कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे विविध उपक्रम राबवून butibori midc news
कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर प्रत्यक्ष कृतीतून विविध उपक्रम राबवित असते. यावेळी त्यांनी देशातील मोठे उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांच्या जन्मदिनी दि. २८ डिसेंबर २०२१ ला बुटीबोरी येथे सकाळी ८ ते ११ या वेळेत मोठ्या प्रमाणात चहा व बिस्किटचे वितरण करण्यात आले व त्यानंतर लगेच भटक्या समाजातील लोकांना अन्नधान्य वाटप व लहान मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले.
थंडीच्या दिवसात चहा बिस्किट घेताना बुटीबोरी येथे रतन टाटा यांचा जन्मदिवस कोणी इतक्या चांगल्या प्रकारे साजरा करू शकते याची कल्पनाही कोणी केली नोव्हती ते कौतुकास्पद कार्य कर्मयोगी फाऊंडेशनने केलं अस अनेकांनी आपलं मत व्यक्त केलं.

butibori midc news
याविषयी कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे सांगतात की रतन टाटा हे भारतातील सर्वात मोठे दानशूर व्यक्तिमत्त्व तसेच नम्रतेच सर्वात मोठं प्रतीक आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबुत करण्यात व अनेक लोकांचे संसार उभे करण्यात त्याचा मोठा वाटा आहे. आपल्या देशावर जेव्हा कोणतेही संकट आले तेव्हा रतन टाटा सर्वात आगोदर मदतीचा हात घेऊन समोर आले म्हणून या दानशूर महामानवाप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या जन्मदिनी लोकांना मदतीतून प्रेमरूपी आनंद देऊन आनंदोत्सव साजरा केला. आपल्या देशात मेल्यावर माणूस चांगला म्हणण्याची प्रथा आहे व माणूस जिवंतपणी ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे, ही प्रथा बंद करून आम्हला जिवंतपणीच लोकांना आनंद द्यायचा आहे. आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो की आम्हाला रतन टाटा या भूतलावरील देव माणसाचा जन्मदिवस साजरा करायला मिळाला याबद्दल त्यांनी ईश्वराचे आभार मानले. रतन टाटा यांचा जन्मदिवस साजरा
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळीनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *