महाकाली फाउंडेशनतर्फे पत्रकारांचा सन्मान

बुटीबोरी : समाज आणि प्रशासनाला जोडणारा दुवा व लोकशाहीच्या चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला स्थान प्राप्त आहे. समाजात अनेक सामाजिक संघटना नागरिकांच्या हितार्थ कार्य करतात. पत्रकारिता समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेते. त्यामुळे ते इतरांबरोबर सन्मानास पात्र असल्याचे मत महाकाली महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष रिता कुटे यांनी व्यक्त केले.

स्थानिक केईसी कॉलनीत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. सोहळ्यात परिसरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. महाकाली महिला फाउंडेशनने विविध कार्यक्रमांतून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला.

ayansh tvs

यावेळी पत्रकार गणेश सोनटक्के, चंदू बोरकर, रमण राखुंडे यांचा रोपटे भेट देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी फाउंडेशनच्या कामिनी रामटेके, स्मिता मुटकुरे, भावना सेंगर, मंजू झामरे, गौरी उंबरकर, शुभांगी सिसट, राखी तिवारी, कुमादिनी बाजवा, सारिका उरकुडे, वैशाली धोपटे व नागरिक उपस्थित होते.butibori

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *