नागपूर ग्रामीण गुन्हे शाखा व बुटीबोरी पोलिसांची संयुक्त कारवाई, 16 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांच्या दणक्याने आनंद भंगला

बुटीबोरी, वार्ताहर परिसरातील हौशींनी मटणाचा बेत आखून त्यात ताश पत्त्यांवर पैशांची बाजी लावण्याचा खेळ रंगवला….ही गोपनीय खबर नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कानावर पडली. गुन्हे शाखेचे विशेष पथक व बुटीबोरी पोलिसांनी संयुक्तपणे अगदी शिताफीतून या खेळावर कारवाईचा दणका हाणत एकूण 16 लाख 62 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 17 संशयित आरोपींवर कारवाई केली. ही कार्यवाई दि. 3 आक्टोंबर रोजी रात्री 10 ते 11 चे सुमारास तालुक्यातील मौजा सोनेगाव (बोरी) करण्यात आली. शेतशिवारात

प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील मौजा सोनेगाव (बोरी) तसेच परिसरातील काही हौशींनी त्याच परिसराच्या शेतशिवारातील एका खुल्या शेडमध्ये मटणाच्या पार्टीचा बेत आखला. या मेजवानीत परिसरातील अनेकांनी आपली हजेरी लावली होती. या मेजवानीत रिकामा वेळ कसा घालवायचा म्हणून काही जुगार प्रेमींनी 52 ताश पत्याचा खेळ मांडला. या खेळात आणखी काही हौशींनी सहभागी होत आपापले नशीब आजमावण्यासाठी पैशांची बाजी लावण्यास सुरुवात केली. खेळ इतका रंगला की त्यांचे खिशे रिकामे झाले तरी त्यांची हौस काही सुटत नव्हती. एकीकडे हे सर्व जुगार प्रेमी आपल्या खेळात तल्लीन झाले असताना मात्र दुसरीकडे याची गुप्त खबर नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यानुसार नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक आशिष मोरखेडे, पोलिस हवालदार मिलींद

नांदुरकर, मयूर ढेकले, पोलिस नायक अमृत किनगे, रोहन डाखोरे, राकेश तालेवार हे पथक सदर ठिकाणाच्या दिशेने रवाना झाले.
रात्री 10 चे सुमारास घटनास्थळी पोचल्यावर या पथकाला जुगार प्रेमींचा घोळका दिसून आला. त्यांनी अगदी शिताफीने त्या ठिकाणी सिनेस्टाईल सापळा रचला. पोलिस आल्याचा सुगावा लागताच घोळक्यातील काहींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळून 17 संशयित आरोपिंना ताब्यात घेत घटनास्थळावरून एकूण 13 मोटर सायकल, 1 चार चाकी वाहन आणि रोख रकमेसह एकूण 16 लाख 62 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांना बुटीबोरी पोलिसांच्या ताब्यात देत त्यांचे विरुद्ध कलम 12 महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील कारवाई बुटीबोरी पोलिस करीत आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *