butibori bazar

सोनेगाव (लोधी) गावात आठवडी बाजाराचे उद्घाटन

नागपूर : नागपूर-चंद्रपूर महामार्गवर असलेल्या सोनेगाव (लोधी) गावात बुधवार दि. १२ जून रोजी आठवडी बाजाराचे उद्घाटन नागपूर पंचायत समितीचे सदस्य व माजी उपसभापती संजय चिकटे यांच्या हस्ते करण्यात आले. आता येथे दर बुधवारला आठवडी बाजार भरल्या जाईल.
सोनेगाव (लोधी) हे गाव नागपूर-चंद्रपूर महामार्गवर असून गावाची लोकसंख्या जवळपास २ हजारांच्या घरात आहे.

परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून गावात आठवडी बाजार भरत नसल्यामुळे येथील नागरिकांना भाजीपाला, किराणा व धान्य घ्यायला गावपासून जवळपास १५ कि. मी. अंतरावर बेला किंवा बुटीबोरी येथे यावे लागत असे. त्यामुळे येथील नागरिकांची चांगलीच दमछाक व्हायची. त्यातल्यात्यात नागरिकांचा पूर्ण दिवसही व्यर्थ जायचा तसेच आर्थिक भूदंड बसायचा तो वेगळाच. त्यामुळे येथील समाजसेवक व माजी सरपंच सुरेश बहादुरे

अमोल ढगे यांनी सोनेगाव (लोधी) येथे आठवडी बाजार भरावा म्हणून ग्रामसभेत ठराव घेऊन सक्षम अधिकाऱ्यांना पाठविला. नागपूर पं. स. सदस्य संजय चिकटे यांनी त्या ठरवाचा पाठपुरावा केल्यामुळे शेवटी आठवडी बाजार भरण्यास संमती देण्यात आली. त्या अनुषंगाने १२ जून रोजी सोनेगाव (लोधी) येथे आठवडी बाजार भरविण्यात येऊन त्याचे उद्घाटन नागपूर पं. स. सदस्य व माजी उपसभापती संजय चिकटे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच नीलिमाढगे, उपसरपंच कविता कुंभरे, वसंत कांबळे, माजी सरपंच सुरेश बहादुरे, अमोल ढगे, प्रीतम पोहणकर, विठ्ठल बिरे, लक्ष्मण ढगे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *