बोथली येथे व्यायामशाळेचा शुभारंभ

बुटीबोरी-आजची तरुणाईला मोबाईलच्या मृगजळात अडकली आहे. ध्येय साध्यासाठी उत्तम आरोग्य महत्त्वाचे आहे. ही गरज ओळखून ग्रामपंचायत बोथलीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळेचा शुभारंभ करण्यात आला.

सरपंचा कविता नामुर्ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अरुण वानखेडे, चंद्रशेखर नमुर्ते, अनिल ठाकरे, गणेश श्रीवास, राजेंद्र कुनघटकर, राजू झोटिंग, हिरामण भिंगारे, विलास चांभारे दशरथ वैद्य, माहुरकर काकाजी, अक्षय भोयर निलेश माहूरक, जानकवार काकू, चव्हाणताई, वाडकरताई आदी उपस्थित होते.

नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात. उतारवयातही शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते. नियमीत व्याययामाने नवीन उर्जा प्राप्त होत असते, असे उपसरपंच अरुण वानखेडे म्ळणले.

याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य प्रकाश झुरमुरे, साधना उताणे, ममता बारंगे, गणेश भरडे, ज्ञानेश्वरी बिजेवार, स्वाती पाटील, गणेश कडू, रमेश गायकवाड, अनिल गवई, इंदू तोडासे, नंदू मरसकोल्हे, तुलसी आत्राम, सत्यफुला जुगनाके, सचिव रवींद्र हुसे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *