बुटीबोरी येथील आयुष आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे आयोजित ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आरोग्य शिबिरात 159 ज्येष्ठ नागरिकांना विविध आरोग्य सेवांचा लाभ मिळाला.

या शिबिरात नॉन-कम्युनिकेबल डिसीज (एनसीडी) स्क्रीनिंग, वातव्याधीचे आयुर्वेदिक उपचार आणि 65 वर्षांवरील लाभार्थ्यांची भाऊसाहेब मुळीक आयुर्वेदीय कॉलेज अँड हॉस्पिटलच्या टीमद्वारे तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन नगर परिषद बुटीबोरी येथील नगरसेवक प्रभाग 7

श्री. मंदार वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वराज्य सामाजिक संघटनेचे अध्यक्ष गौरव हजारे यांचीही उपस्थिती होती. सर्व लाभार्थ्यांना आयुर्वेद विषयक पुस्तिका वाटप करण्यात आली. या कार्यक्रमात केंद्र प्रमुख डॉ. लिखितकर मॅडम आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.