बुटीबोरी (१० एप्रिल २०२५) – श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर आणि सकल जैन समाज बुटीबोरी यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान महावीर जयंतीचा पावन उत्सव अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

या पावन दिवशी सकाळी श्रीजींच्या मंगलाभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पंचामृत स्नान, शांतिधारा, पूजा-अर्चा आणि अभिषेक विधी पार पडले. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भगवान महावीरांचा जयघोष केला.

महावीर स्वामींच्या जीवनावर आधारित प्रवचन व धम्म संदेशाचे आयोजन करण्यात आले होते. समाजबांधवांनी संयम, अहिंसा आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा संकल्प घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वत्र महावीर स्वामींच्या जयजयकाराने वातावरण भक्तिमय झाले होते.