बुटीबोरीत शहर स्वच्छतेने गाडगेबाबा जयंती

बुटीबोरी थोर समाजसुधारक व स्वच्छतेचे जनक संत श्री गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त नगरपरिषद कार्यालयात गाडगेबाबा जयंती शहर स्वच्छतेने उत्साहात पार पडली.

दरम्यान, स्वच्छता रॅली काढण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष बबलू गौतम, उपाध्यक्ष अविनाश गुर्जर, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, पाणीपुरवठा सभापती मंदार वानखेडे, शिक्षण सभापती विनोद लोहकरे,

अभियंता नेहा पोतले, आस्थापना विभागप्रमुख सुभाष श्रीपदवार, लेखाधिकारी आनंद नागपुरे यांनी बुटीबोरी मुख्य मार्गावरील सर्व कचरा स्वच्छ करून गोळा केला.

ही रॅली नगरपरिषदेजवळून शिवाजी चौकातून मुख्य मार्गाने येऊन नगरपरिषद येथे समारोप झाला. या रॅलीत बुटीबोरीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *