बुटीबोरी:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, बुटीबोरी येथील वीर सावरकर कॉलनी व केएसी कॉलनी या औद्योगिक वसाहतीमध्ये आज एका निशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

हे शिबिर चौधरी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने घेण्यात आले. शिबिरामध्ये हॉस्पिटलचे डॉक्टर रमण चौधरी आणि त्यांचा वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपस्थित होता व त्यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली.

या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक भिमाई महिला मंडळाने केले होते. परिसरातील अन्य मान्यवर देखील याप्रसंगी उपस्थित होते. चौधरी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि भिमाई महिला मंडळाच्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना निशुल्क आरोग्य सेवेचा लाभ मिळाला.